चला करूया गणेश आराधना..... - Marathi News 24taas.com

चला करूया गणेश आराधना.....

www.24taas.com
 
श्री गणेशाचे आध्यात्मिक स्वरूप
 

गणेश देवतेचे स्वरूप साऱ्यांना माहितीची आहे. आता या देवतेचे आध्यात्मिक स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. "गणपत्यर्थवशीर्षा'त या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे, ते असे.
 
"हे गणेशा, तू तत्व आहेस. तू प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस. तू सर्व काही आहेस''. वाड्:मयाच्या अंतरंगात गणेशाचे अस्तित्व लक्षात येते, तर हीच गणेशाची उपस्थिती नादब्रम्हतही अनुभवता येते. तसेच गणेशोपासना प्रणयोपासनातूनही साध्य होते. अंतत: ही उपासना साक्षात ब्रम्हविद्याच आहे. मुद्गलपुराणात गणपतीचे असे व्यापक वर्णन केले आहे.
 
ज्या मूलाधार चक्रात गणपतीचे अस्तित्व सतत असते ते चक्र आणि तेथील कमळ लाल रंगाचे आहे म्हणून या देवतेला रक्तपुष्प, रक्तवस्त्र आणि रक्तचंदन यांची आवड आहे. गणेशाच्या पूजनात रक्तवर्ण असा विपुलतेने योजलेला आहे. गणेशाची अशी विविध वर्णने साहित्यात अनेक ठिकाणी वाचायला मिळतात.
 
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 06:50


comments powered by Disqus