जेव्हा स्वप्नात मंदिर दिसतं... - Marathi News 24taas.com

जेव्हा स्वप्नात मंदिर दिसतं...

www.24taas.com, मुंबई
 
मनुष्य सुखी असताना देवाची आठवण काढत नाही. मात्र जेव्हा संकट येतं तेव्हा मनुष्याला देवाची आठवण येतो. संकटग्रस्त माणूस वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेऊ लागतो. पूजा पाठ करू लागतो. देवाची करूणा भाकायला लागतो. काहीवेळा मनःशांती मिळवण्यासठी माणूस मंदिरात जातो. तिथल्या धारमिक वातावरणात चित्त शांत होतं. देवाचं दर्शन घडल्याचं समाधान होतं. स्वप्नांत देवाची मूर्ती क्वचितच दिसते. मात्र, जेव्हा अशी मूर्ती दिसते,तेव्हा मात्र आयुष्यातील जुन्या पापांचं क्षालन होतं.
 
देवाचं साक्षात् दर्शन व्हावं, अशी सर्वांनाच इच्छा असते. मात्र, देव दर्शन केवळ पुण्यवान व्यक्तींनाच घडतं. पुराणामध्ये देवा प्रसन्न व्हावा यासाठी कठोर तपःश्चर्या केली जाई. आजही हे शक्य आहे. मात्र तुम्ही मनाने निष्पाप आणि निर्मळ असलं पाहिजे. आता भगवंताचा साक्षात्कार घडणं कठीण आहे. मात्र स्वप्नामध्ये देवाचा दृष्टांत घडू शकतो.
 
काही जणांना स्वप्नांत देव दिसतो, तर काही जणांना मंदिर दिसतं. स्वप्नांत देवाचं दर्शन होणं चागलंही असू शकतं किंवा वाईटही. देव आणि मंदिरांचं दर्शन हे आपल्या कित्येक जन्मांचं पाप नष्ट करतं. आपली जुनी पापं धुवून टाकतं. आपल्याला शुद्ध केलं गेल्याचा तो एक संकेत असतो.
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 13:03


comments powered by Disqus