भगवान शंकरांच्या त्रिशुळाचं गूढ - Marathi News 24taas.com

भगवान शंकरांच्या त्रिशुळाचं गूढ

www.24taas.com, मुंबई
 
आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाच्या डोळ्यांमध्ये अपार करुणा असते पण त्याचरोबर देव नेहमीच सशस्त्र असतो. भगवान शंकर हे योगेश्वर मानले जातात. समाधीस्थ असणारे, भक्ताला ताबडतोब प्रसन्न होणारे शिवशंकर यांच्यासोबत नेहमी त्रिशूळ का असतो?  तीन तीक्ष्ण टोक दिसतात. या त्रिशुळाने भगवान शंकर कुणाचा संहार करण्याची प्रेरणा देत असतात? शिवशंकरांच्या त्रिशुळाचं गूढ काय आहे?
 
या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत... सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे सात्विक भाव. कुठल्याही प्रकारच्या हिंसेचा विचार यात नसतो. रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी म्हणजेच विध्वंसक आणि तापट प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. मात्र या प्रवृत्तींचे प्रमाण वेगवेगळे असते.
 
त्रिशुळाची तीन टोकं ही याच प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शंकरांच्या हातातील त्रिशूळ याच तीन गुणांना आपल्या ताब्यात ठेण्याची संकल्पना अधोरेखीत करतात. हातात असणारा त्रिशूल म्हणजे या तीन गुणांवर असणारं नियंत्रण होय. हा त्रिशूळ तेव्हाच उचलावा जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करावा असा संदेश धर्मशास्त्र देते.

First Published: Monday, July 16, 2012, 19:52


comments powered by Disqus