Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:25
www.24taas.com, मुंबई बऱ्याचदा लहान मुलांना रात्री भीती वाटते. शांत झोप लागत नाही. झोपल्यास त्यांना वाईट स्वप्नं पडतात आणि ते झोपेतून दचकून जागे होतात. त्यामुळेच बहुतेक वेळा लहान मुलं एकटी किंवा घराबाहेरच् वातावरणात झोपण्यास तयार नसतात.
हे घडण्यामागचं कारण म्हणजे लहान मुलांचा मेंदू खूप नाजूक असतो. आसपास घडणाऱ्या नकारात्मक घट नांचा त्यावर प्रभाव पडत असतो. मात्र तो इतर वेळी मुलांच्या लक्षात येत नाही. रात्री शांत झोपल्वर मेंदूमध्ये साठलेली नकारात्मक कंपनं आपली शक्ती दाखवू लागतात.
लहान मुलांना अशा वाईट स्वप्नांपासून मुक्त करण्याचा सोपा उपाय आहे. एखाद्या शनिवारी पिपंळाच्या झाडाची लहानशी फांदी तोडून घरी आणा, ती गंगेच्या पाण्याने धुवा. त्यावर गोमुत्र शिंपडा. ह फांदी मुलांच्या उशीखाली ठेवा. या अभिमंत्रित फांदीचा प्रभाव तुम्हाला निश्चितच जाणवेल. लहान मुलांना दचकवणारी स्वप्नं पडणं लवकरच बंद होईल. त्यांना शांत झोप लागेल.
First Published: Tuesday, July 17, 2012, 17:25