हनुमान मूर्ती का असते नेहमी शेंदूरचर्चित? - Marathi News 24taas.com

हनुमान मूर्ती का असते नेहमी शेंदूरचर्चित?

www.24taas.com, मुंबई
 
खरंतर शेंदूर हा विवाहित स्त्रिया आपल्या भांगात भरतात. पण काही देवतांच्या मूर्तींनाही शेंदूर लावूनच सजवलं जातं. गणपतीच नव्हे, तर हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो. संपूर्ण मूर्तीलाच शेंदूर फासण्याचं काय कारण आहे? हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं.
 
एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”
 
सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शएंदुराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावरशेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंग बली बनुमानाने पल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात.

First Published: Wednesday, July 25, 2012, 17:11


comments powered by Disqus