Last Updated: Saturday, July 28, 2012, 22:10
www.24taas.com, मुंबई आपलं आणि कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहाण्यासाठी घरामध्ये स्वच्छता ठेवणे आवश्यक असतं. घरामध्ये कचरा,धूळ,माती आसता कामा नये, कारण हे आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. याबरोबरच आपल्या आर्थिक परिस्थितिवरही याचा विपरीत परिणामही होतो.
शास्त्रानुसार ज्या घरात घाण आसते, त्या घरात नेहमीच आर्थिक संकटे येतात. जेंव्हा आपण बाहेर जातो,तेव्हा आपल्या चप्पल-बुटांना घाण लागलेली आसते. अशा वेळेस बहुतांशी लोक तेच चप्पल-बूट घरात घालून येतात. खरंतर शस्त्राप्रमाणे अनवाणी पायानेच घरात फिरायला पाहिजे. कारण घरामध्ये देव असतात आणि त्या ठिकाणी चप्पल घालून फिरणं अशुभ मानलं जातं.
घरात व घराच्या बाहेर फिरण्यासाठी वेगवेगळ्या चप्पल आसाव्यात की ज्यामुळे घरामध्ये घाण येणार नाही. हे जर आपण पाळलं तर आपलं घर आणि आपल्या सर्वांचं आरोग्य निरोगी राहील.
First Published: Saturday, July 28, 2012, 22:10