Last Updated: Sunday, July 29, 2012, 19:28
www.24taas.com, मुंबई ऑफिसचं काम, येण्या-जाण्याच्या वेळा, ताण-तणाव यामुळे पती-पत्नींना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. यातून अनेक समस्या निर्माण होतात. घरात वारंवार भांडणं होऊ लागतात. घरातील शांतता भंग पावते. वातावरण प्रसन्न राहात नाही.
आपल्याही घरात अशी भांडणं वारंवार घडत असतील, तर या भांडणांना आवर घालण्यासाठी तर एक उपाय आहे. खालील मंत्राची जप केल्यास तुम्हाला फायदा जाणवेल.
मंत्र ऊँ कं कं ज्ञं ज्ञ: मम (आपल्या पतीचं नाव) वश्य कुरु कुरु स्वाहा। ज्या घरात पतीशी भांडण होत असेल, त्या घरातील पत्नीने २१ दिवस वरील मंत्राचा एक माळ जप करावा. मम आणि वश्य या शब्दांच्या मध्ये आपल्या पतीच्या नावाच उच्चार करावा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. पतीची चिडचिड कमी होईल. भांडणं कमी होती. आणि घरात पुन्हा सुख शांती नांदू लागेल.
First Published: Sunday, July 29, 2012, 19:28