घरात भुतांचा भास होऊ लागल्यास... - Marathi News 24taas.com

घरात भुतांचा भास होऊ लागल्यास...

www.24taas.com, मुंबई
 
काही घरे अशी आसतात की त्या घरातील राहाणारे लोक कधी सुखी नसतात. त्यांना नेहमी संकटांना सामोरे जावे लागते. तर कधी अमानवी सावल्याही दिसतात. काही वेळेस अशा घटनांमुळे मृत्युलाही सामोरे जावे लागते. अशा घरांना भूत बंगलेही मानलं जातं. अशा घरात काही अमानवी शक्ती वास्तव्य करत आसल्याने ती शक्ती घरातील लोकांना त्रास देत असते.
 

  • जर आपणही अशा समस्यांनी हैराण झाला आसाल तर खाली दिलेल्या तंत्राचा वापर करुन या समस्यांपासून सुटका करुन घ्या.


 

  • शनिवारी नारळ आणि बदाम वाहत्या पाण्यात सोडा.


 

  • दररोज एक वाटी तांदूळ दान करा आणि दररोज श्री गणेशाची पूजा करा. ही पूजा वर्षभर करा. त्यानंतर पहा घरातील सर्व समस्या दूर होतील. तसंच अपूर्ण राहिलेली कामेही पूर्ण होतील


 

  • जे लोक अशा घरात राहतात त्यांचं मन कुठल्याही कामात लागत नाही. असं जर होतं असेल तर रविवारी सकाळी शंकराच्या मंदिरात मद्य चढवा आणि रिकामी बाटली सात वेळा आपल्या डोक्यावरुन ओवाळून झाडाखाली ठेवा.


 

  • मंदिरात अशोकाची सात पानं ठेऊन पूजा करा. ती पाने सुकल्यानंतर नवीन पाने तेथे ठेवा आणि सुकलेली पाने पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. अशी पूजा नियमित केल्याने घरातील भूतबाधा,नजर लागणे अशा सर्व संकटापासून तुमची मुक्तता होईल.

First Published: Thursday, August 2, 2012, 16:25


comments powered by Disqus