Last Updated: Wednesday, November 2, 2011, 13:01
झी २४ तास वेब टीमवाईट सवयी आणि आजारापासून वाचण्यासाठी काही तोडगे दिले हेत. हे जरासे वेगळे वाटतील पण, त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल.
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीतल्या सहाव्या घरात चंद्र असेल तर तुमच्या मागे कुठला न कुठला आजार हा कायमच लागलेला असतो. चंद्राबरोबरच ८ हा अंक लिहिला असेल तर तुम्हाला अपमान, दारिद्र्य या गोष्टींशी सामना करावा लागू शकतो. ज्या लोकांच्या कुंडलीत सहाव्या घरात ८ अंकाबरोबर चंद्र असेल त्यांच्या संपत्तीची चोरी होण्याची शक्यता असते. लाल किताबमध्ये असं म्हटलं आहे की अशा लोकांची पचनशक्ती आणि कामवासना अधिक तीव्र असते. अशा लोकांचे अनेक स्त्रियांसोबत शरीरसंबंध असतात. अशा लोकांना कायम शत्रूपासून धोका असतो. मामा आणि मावशीच्या बाजूनेही संकटं निर्माण होऊ शकतात. अशी लोकं कामातूर आणि उपभोगांना चटावलेली असतात आणि आपल्या वासनांचं शमन करण्यासाठी कुठलीही पातळी गाठण्यास ते तयार असतात. जर चंद्रासोबत पत्रिकेत केतुही असेल तर अशा लोकांना गुप्त रोग होण्याचीही शक्यता असते.
यापासून वाचण्यासाठी पुढील तोडगे पाहा-
१) स्मशानात हॅण्डपंप बसवा
२) मंदिरात दूध , चणा डाळ (बेसन), बडीशेप दान करा.
३) वडिलांना दूध पाजा.
४) रात्री दूध पिऊ नका.
५) ससा पाळा
६) आई वडलांची सेवा करा.
First Published: Wednesday, November 2, 2011, 13:01