अंगठा उलगडणार सेक्सचं इंगीत - Marathi News 24taas.com

अंगठा उलगडणार सेक्सचं इंगीत

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
हाताचा अंगठा आता सांगणार आपल्याला प्रेम की सेक्स यापैकी काय जरूरी आहे ते ! आपला विश्वास बसणार नाही. परंतु यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे.  प्रेम की सेक्स याचे राज अंगठ्याखालील भाग सांगू शकणार आहे.
 

कसे ते पाहू...


 
अंगठ्याच्या दुसर् या  पेराच्या खालील भाग शुक्र पर्वत म्हणून ओळखला जातो, असे हस्तरेषा तज्ज्ञाचे म्हणणे आहे. युनानी प्रथेनुसार शुक्र ही सौंदर्याची देवता मानली जाते. ज्याच्या हातावर शुक्र पर्वत रेषास्तर असेल तो भाग्यवान. त्यानुसार ती व्यक्ती सुंदर आणि सभ्य असते. अशा व्यक्तीचा स्वभाव चांगला असतो. त्यामुळे अशा व्यक्ती दुसर् यावर प्रभाव टाकतात.
 

हे कसे समजते...


 
- अंगठ्याखालील काही भाग जास्त उठावदार आणि दिसायला फिकट तसेच पिवळा  असेल तर अशा व्यक्ती सेक्सला अधिक प्राधान्य देतात. तर हाताच्याबरोबर अंगठ्याचा खालील भाग जादा विकसित असेल तर ती व्यक्ती उपभोग घेणारी असते. अशी प्रेम करणारी व्यक्ती जास्त महत्व देते.
 
- तसेच अंगठाच्या खालील भाग पूर्णत: उठलेला दिसून येत असेल आणि भाग्यरेषा संतुलीत नसेल तर अशी व्यक्ती वासनांन असू शकते. किंवा  वासनेला प्राधान्य देणारी असते.
 
- अंगठ्याचा खालील भाग हाताच्या पहिल्या बोटाकडे झुकलेला असेल तर असे लोक प्रेमाच्याबाबतीत कोमल नसतात. ते अधिक भडकतात. त्यामुळे ते प्रेमाला प्राधान्य देत नाहीत.
 
- ज्या लोकांच्या हाताचा शुक्र पर्वत जरूरीपेक्षा जास्त विकसित असेल तर असे लोक भिन्न लिंग व्यक्तींशी जास्त आकर्षित होतात.
 
आंगठ्याचा खालील भागावर क्राॅस तसेच चंद्राची निशानी असेल तर अशा व्यक्ती ऐहिक सुखाच्या गुलाम असतात. त्या व्यक्ती  प्रेमात  यशस्वी  होतात.
 
आंगठ्याचा खालील भागाचा हिस्सा कमी असेल तर अशा व्यक्ती जीवनात दु:खी तसेच त्रस्त असतात.
 

First Published: Thursday, March 15, 2012, 23:41


comments powered by Disqus