वास्तूशास्त्राप्रमाणे कोठे झोपावे? - Marathi News 24taas.com

वास्तूशास्त्राप्रमाणे कोठे झोपावे?

www.24taas.com, मुंबई
 
आपण घर घेत असताना वास्तूशास्त्राला प्राधान्य देत असतो. घरात एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर, त्या घरात राहणा-या सदस्यांना वास्तूदोषाचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे मानले जाते. त्याचप्रमाणे आपण घरात असताना कोठे झोपावे, याचाही नियम  आहे.
 
घरात एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर, त्या घरात राहणा-या सदस्यांना वास्तूदोषाचा त्रास सहन करावा लागू शकतो. वास्तूदोषामुळे मानसिक अशांतता वाढते. त्यामुळे आपण कुठे झोपावे याचा विचार केला पाहिजे. वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो.
 
वास्तूशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर सुख-समृद्धी प्राप्त होते. घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. घरात दरवाजाजवळ असलेल्या पलंगावर झोपणा-या व्यक्तीचे मन नेहमी अशांत राहते. त्या व्यक्तीचे कोणत्याही कामात मन एकाग्र होत नाही. दरवाजाजवळ झोपल्याने झोपही व्यवस्थित होत नाही. व्यक्तीला मन अशांत करणारे स्वप्न पडतात. त्यामुळे दरवाजाजवळ पलंग ठेऊ नये. जेणेकरून त्याठिकाणी झोपणे होत नाही.
 

First Published: Thursday, May 10, 2012, 15:43


comments powered by Disqus