ऐका… कावळा काय सांगतोय!, what says Crow

ऐका… कावळा काय सांगतोय!

ऐका… कावळा काय सांगतोय!
www.24taas.com, मुंबई

हिंदू धर्मात शकुन अपशकून यांना फार महत्त्व आहे. प्रत्येक कार्याच्या आधी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना भविष्यातील घटनांशी जोडून पाहिले जाते. शास्त्रात प्राण्यांशी संबंधित अनेक शकुन आणि अपशकुन सांगण्यात आले आहेत. या प्राण्यांमध्ये मांजर, गाय, कुत्रा, पक्षी आदींचा समावेश आहे. ज्योतिष्यशास्त्रात कावळ्याशी निगडीत अनेक शकून आणि अपशकून सांगितले गेले आहेत.

 जर अनेक कावळे एखाद्या गावात एकत्रितपणे आवाज करीत (ओरडत) असतील,तर त्या गावावर एखादे संकट येणार आहे असे समजावे.

 एखाद्या घरावर कावळ्यांचा समूह येऊन आवाज करत असेल, तर घराच्या मालकावर विविध संकट एकाच वेळी येण्याची शक्यता आहे.

 एखाद्या मनुष्याच्या अंगावर कावळा येऊन बसला, तर त्याच्या पैशाची हानी होते. एखाद्या महिलेच्या डोक्यावर कावळा बसला, तर तिच्या नवऱ्यावर एखादे संकट येण्याची शक्यता असते.

 प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या समोर कावळा आवाज(काव-काव) करून गेला, तर त्या व्यक्तीचे काम यशस्वी होते.

 कावळा पाणी भरलेल्या भांड्यावर बसलेला दिसला, तर धन-धान्यात वृद्धी होते.

 कावळ्याच्या चोचीत अन्नाचा किंवा मांसाचा तुकडा दिसला तर, चांगले फळ प्राप्त होते.

 उडणाऱ्या कावळ्याने एखाद्या व्यक्तीला चोच मारली, तर त्या व्यक्तीला आजार होण्याची शक्यता असते.

 कावळा पंख फडफडत कर्कश आवाज करीत गेला, तर तो अशुभ संकेत असतो.

 जर कावळा आकाशाकडे तोंड करून कर्कश आवाज करीत असेल, तर तो मृत्युचा संकेत आहे असे समजावे.

First Published: Friday, April 12, 2013, 08:11


comments powered by Disqus