Last Updated: Wednesday, January 15, 2014, 21:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपाल हा तसा विचित्र दिसणारा प्राणी. इतर गोष्टीना न घाबरणारी माणसं पालीला मात्र घाबरतात. अत्यंत किळसवाण्या वाटणाऱ्या पालीला पाहिलं तरी अंगावर काटाच उभा राहतो. पाल अंगावर पडली की अंघोळ केली जाते. यामागे नक्की कारण काय?
असं म्हणतात, की पाल जर अंगावर पडली तर लगेच आंघोळ करावी. तिचा स्पर्श जरी झाला तरी अंग स्वच्छ धुवून घ्यावे. काहीजणांना ही अंधश्रद्धा वाटते. मात्र ही काही अंधश्रद्धा नाही तर यामागेही काही वैज्ञानिक कारणे आहेत. वडीलधाऱ्या माणसांसाठी जरी हा परंपरेचा भाग असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालंय की, पालीचा स्पर्श आपल्या शरीरास झाल्यास तो भाग अथवा शरीर लगेच धुवून घ्यावे. पाल ही ‘फायलम कारडाटा’ या समूहात येते आणि या समूहातील प्राणी आपल्या शरीरातील विष (युरिक अॅसिड) आपल्या शरीरावर जमा करतात. त्यामुळे हे प्राणी सुरक्षित राहतात.
जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा तिच्या शरीरातील विष ती समोरच्या शरीरावर फेकते.त्यानंतर हे विष छिद्रातून आत शरीरात जाते आणि आत जाऊन त्वचारोग किंवा शारीरिक व्याधीचं कारण बनू शकते. यामुळेच पाल अंगावर पडली तर आंघोळ करावी. काही ठिकाणी पूजाही केली जाते. या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. त्याचं महत्वही तसंच आहे. कारण तुळशीची पाने खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी होतो.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 28, 2013, 17:04