मृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन? Why do sandalwood keep on corpse mouth?

मृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन?

मृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन?
www.24taas.com, मुंबई

हिंदूंमध्ये मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची पद्धत आहे. ज्यावेळी मृतदेहाला जाळण्यात येतं, त्याआधी मृतकाच्या तोंडावर चंदन ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. काय आहे यामागील शास्त्रीय आणि अध्यात्मिक कारण?

चंदनाचं लाकूड शीतल मानलं जातं. चंदन उगाळून कपाळावर त्याचा टिळा लावल्याने डोकं शांत राहातं. त्याचप्रमाणे मृत पावलेल्या व्यक्तीच्या तोंडावर चंदन ठेवल्यास अग्नी दिल्यावर मृतांना शांती मिळते, असं मानलं जातं. यामुळे मृत्यूपश्चात मृतकांना स्वर्गातही शांती मिळते.


याशिवाय दुसरं व्यावहारिक कारण असं आहे, की जेव्हा मृतदेहाला अग्नी दिला जातो, तेव्हा मृतकांचं मांस वितळू लागतं, हाडं जळू लागतात. यांमुळे वातावरणात कमालीचा दुर्गंध पसरतो. अशावेळी चंदनाचं लाकूड जळू लागलं, की हवेतील दुर्गंधी कमी होते.

First Published: Wednesday, March 20, 2013, 17:46


comments powered by Disqus