Last Updated: Friday, August 24, 2012, 16:28
www.24taas.com, मुंबईघरामध्ये देवघर असावे. यामुळे घरातील वातावरण पवित्र बनतं. तसंच आपल्यावर देवाची नजर आहे, अशी भावना सतत मनात राहून मानसिक स्थैर्य लाभतं. देव्हाऱ्यातील मूर्तींवर क्षद्धा समप्रित करत असल्याने या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावल्यावर मनातील हुरहूर, चिंता कमी होते.
घरात देव्हारा असला की अनेक समस्या घरामध्ये येत नाहीत. याची आपल्याला जाणीवही नसते. देवाची भक्ती केल्यास नेहमीच मनाला उभारी मिळते. पण देव्हाऱ्यात देवांची मूर्ती कशी असावी, याचे काही नियम आहेत. त्यानुसार मूर्ती ठेवल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात.
देव्हारा वाटेल तिथे बनवू नये. तसंच शौचालयाच्या जवळ देव्हारा नसावा. देव्हाऱ्यातील मूर्तींचा आकार ३ इंचांपेक्षा अधिक नसावा. आपल्या अंगठ्याच्या उंचीएवढ्या मूर्ती असाव्यात. याहून मोठ्या मूर्ती देव्हाऱ्यात नसाव्यात. देवाच्या मूर्ती संवेदनशील असतात. जर मोठ्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवल्या तर त्यासाठी कडक सोवळं पाळावं लागतं. वेगळे नियम अनुसरावे लागतात. त्याची वेगळी पूजा करावी लागते. या पुजेत चूक ही अशुभ मानली जाते. त्यामुळेच देव्हाऱ्यात लहान मूर्तीच असाव्यात
First Published: Friday, August 24, 2012, 16:28