घरात का ठेवतात लव्ह बर्डस्? why use love birds in home

घरात का ठेवतात लव्ह बर्डस्?

घरात का ठेवतात लव्ह बर्डस्?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

युरोप आणि पाश्चात्य देशातील काही लोक आपल्या घरात `लव्ह बर्डस` ठेवतात. हे बर्डस दांपत्य जीवनात प्रेम आणि आनंद आणतात, असा त्यांचा विश्वास आहे.

तुम्हीसुद्धा घरात लव्ह बर्डस ठेवण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. हे पक्षी पिंजर्याीत बंद ठेवू नका. कारण ते बंद केले तर तुमच्या आपसातील संबंधांत दृढता येत नाही. तुमचं नातं बंधनात अडकल्यासारखं होतं.

फेंगशुईत वास्तू किंवा घराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्यासला प्रेमाचे क्षेत्र मानले आहे. या कोपर्याअला प्रकाशमय ठेवल्याने दांपत्य जीवन प्रगाढ होऊन त्यांच्या प्रेमात वाढ होते. यासाठी शयनकक्षेत किंवा घराच्या दक्षिण-पश्चिम भागात `मेडेरियन डक्स` ठेवणे लाभदायक असते. अविवाहित युवक-युवतींच्या खोलीत दक्षिण-पश्चिम भागात `मेडेरियन एक्स`चे जोडपे किंवा त्यांचे चित्र जरी ठेवले तरी त्यांचे लग्न लवकरात लवकर ठरते, असाही समज आहे.

बाजारात निरनिराळ्या प्रकारचे `मेंडेरियन डक्स` मिळतात. यात दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवण्यासाठी रोज क्वार्टजपासून बनलेले `मेंडेरियन डक्स`ला चांगले असतात. पण हे ठेवताना त्यांची संख्या नेहमी दोन असायला हवी, त्यात एक नर व दुसरी मादी हवी हे लक्षात ठेवा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 14, 2013, 07:58


comments powered by Disqus