Last Updated: Thursday, February 28, 2013, 13:42
www.24taas.com, नवी दिल्लीअर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज यूपीए-२ चे शेवटचे बजेट सादर कले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांसमोर दोन मुख्य आव्हाने होती. एकीकडे अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जनतेला खूश करणे हेही होते.
जनतेला खुश करत अर्थमंत्रींनी बजेटमध्ये सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन घोषणा केली. जो व्यक्ती पहिल्यांदा घर खरेदी करणार त्यावेळी त्याने घेतलेल्या होम लोनच्या व्याजावर सूट देण्यात येणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.
या शिवाय २५ लाख पर्यंतच्या होम लोन वर एक लाख रुपये व्याजाची सूट देण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट १.५ लाख होती. त्यामुळे आता एकूण २.५ लाखांची सूट होणार आहे.
महिलांनाही केले अर्थमंत्र्यांनी खूश>महिला विशेष बँकेसाठी ऑक्टोीबर २०१३ पर्यंत बँकिंग परवाना
>महिला सार्वजनिक बँकेसाठी १ हजार कोटी रुपंयाचा सरकारकडून निधी
>अर्थमंत्र्यांची महिलांसाठी ऐतिहासिक घोषणा । महिला सक्षमीकरणावर दिला भर
>बॅंकेतील सर्व कर्मचारी महिलाच असणार
>महिलांची सरकारी बँक १०० कोटी रुपयांनी सुरू होणार
>महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रात पहिली बॅंक सुरू होणार
>महिलांसाठी पहिली बँक सुरू होणार
First Published: Thursday, February 28, 2013, 13:42