Last Updated: Thursday, February 21, 2013, 10:26
www.24taas.com, नवी दिल्ली आजपासून संसदेत यंदाच्या बजेट सत्राला सुरुवात होतेय. भ्रष्टाचारासारख्या विषयांना घेऊन हंगामा करण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झालाय. सरकारनं विरोधकांना आपल्या बाजूनं वळवण्याचा थोडाफार प्रयत्न करताना, सगळ्या मुद्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी हॅलिकॉप्टर घोटाळ्याच्या चौकशीसाठीही सरकारनं तयारी दर्शवलीय.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘भगवा दहतशतवाद’ या शब्दानं बरीच टीकेची झोड ओढवून घेतली होती. पण, शिंदे यांनी बुधवारी, संध्याकाळीच माफी मागून हा वाद क्षमवण्याचा प्रयत्न केलाय. आपला कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडण्याचा आशय नव्हता, असं स्पष्टीकरण शिंदे यांनी यावेळी दिलंय.
भाजपनं शिंदे यांच्या या माफिनाम्याचं स्वागतच केलंय. पण, माफिसाठी त्यांनी बराच वेळ घेतला असंही म्हटलंय. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा संसदेत न उठवता इथंच संपवण्यात येत असल्याचंही भाजपनं म्हटलंय.
आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं संसदेत अर्थसंकल्प मांडण्याला सुरुवात होतेय. अनेक विधायक कामांना या सत्रात मंजुरी मिळू शकते. यामध्ये तीन अध्यादेशांसहीत १६ विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे तर ३५ विधेयकांना संमती मिळू शकते. राष्ट्रीय खाद्या सुरक्षा विधेयक, अपराधिक न्यायव्यवस्था संशोधन विधेयक,पदोन्नतीसाठी आरक्षण तसंच कार्यालयात महिलांचा लैंगिक छळ रोखण्याविषयीचं विधेयक या सत्रात मांडलं जाणार आहे.
संसदेत २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प तसंच २८ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल रेल्वे बजेट सादर करतील तर अर्थमत्री पी. चिदंबरम देशाचा अर्थसंकल्प...
First Published: Thursday, February 21, 2013, 10:20