Last Updated: Thursday, February 28, 2013, 16:34
www.24taas.com, नवी दिल्लीआज अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सरकार, पंतप्रधान आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातर्फे देशाला तीन वचनं दिली. ही तीन वचनं देशातील महिला, तरुण आणि गरीब या तीन वर्गांसाठी आहेत.
लोकसभेत अर्तसंकल्प सादर करताना चिदम्बरम म्हणाले, की भारताच्या बहुतांश रुपांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन रुपांचा मी उल्लेख करत आहे. त्यातील पहिलं रुप महिलांचं. त्यात लहान मुली, विद्यार्थिनी, गृहिणी, काम करणाऱ्या मुली आणि आई समाविष्ट आहेत.
चिदम्बरम यांनी दुसरं रूप तरुणाईचं असल्याचं सांगितलं. देशातील तरुण उत्साही आहेत. महत्वाकांक्षी आहेत आणि दोघेही देशाच्या नव्या पिढीच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात. अर्थसंकल्प तयार करताना तो महिलांप्रमाणे देशातील युवा शक्तीचा विचार करून बनवला आहे. तर तिसरं रूप हे देशातील गरीबांचं आहे. ज्यांना लहानशा मदतीची शिष्यवृत्तींची गरज आहे. अनुदान हवं आहे. भत्ता किंवा पेन्शन हवं आहे. या तीन रुपांना समोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प चिदम्बरम यांनी सादर केला.
First Published: Thursday, February 28, 2013, 16:34