Last Updated: Monday, June 24, 2013, 16:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयाने सलमान खानचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे सलमान खानला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात सलमाननं सेशन कोर्टात अपील केलं होतं. आपल्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतून आपल्याला मुक्त करण्यात यावं, असं अपील सलमान खानने केलं होतं. मात्र हे अपील फेटाळून लावल्यामुळे सलमान खानच्या अडचणींमध्ये वाढ आहे.
28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानच्या कारनं धडक दिल्यानं एकाचा मृत्यू आणि 5 कामगार जखमी झाले होते. या प्रकरणी सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदावण्यात येणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 24, 2013, 16:42