`तलाश`नेही केली १०० कोटींची कमाई 100 crores crossed by Talaash

`तलाश`नेही केली १०० कोटींची कमाई

`तलाश`नेही केली १०० कोटींची कमाई
www.24taas.com, मुंबई

`तलाश` सिनेमाने आत्तापर्यत भारतात 79 कोटी आणि ओव्हरऑल 100 कोटीचा आकडा पार केलाय. तलाशच्या टीमने 100 कोटींची सक्सेस पार्टी एन्जॉय़ केली. बघता बघता आमीर खानच्या ‘तलाश’ सिनेमानेही 100 कोटींची कमाई केली.
खरंतर आमीरच्याच शब्दात सांगायंच झालं तर तलाश हा सिनेमा वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या विषयाचा असूनही त्याने 100 कोटी कमावले म्हणजे खरं कौतुकच आहे.

विशेष म्हणजे फक्त बॉक्स ऑफीसवर हेच समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी केलेलं कौतुक आपल्या टीमसोबत सेलिब्रेट करण्यासाठी खास पार्टी आयोजन करण्यात आली होती. पार्टीला हजर असलेल्या करीना कपूरनेही या यशाचं श्रेय प्रेक्षकांना देत आभार मानले आणि खास करून आपल्या भूमिकेला विशेष दाद दिल्याबद्दल आपल्याला खुपच आनंद झाल्याचंही तिने सांगितलं. विशेष म्हणजे या पार्टीसाठी खास करून शबाना आझमी आणि जावेद अख्तरही हजर होते.

एकुणच आपला हटके स्टाईलचा, हटके विषयाचा हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो की नाही अशी धाकधूक मनात असतानाच प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे पार्टी तो बनती है ना बॉस म्हणतच `तलाश`ची सक्सेस पार्टी शानदार पार पडली.

First Published: Tuesday, December 11, 2012, 19:43


comments powered by Disqus