Last Updated: Saturday, January 11, 2014, 20:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईटाइमपास या सिनेमानं आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एका आठवड्यातच सिनेमानं१४ कोटींचा आकडा पार केलाय. याच बरोबर प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विकेंडमध्ये राज्यभरात शोची संख्याही वाढवण्यात आली आहे.
एसेल व्हिजनचा टाइमपास हा सिनेमा नवा इतिहास रचतोय. एका आठवड्यातच या फिल्मनं १४ कोटींचा पल्ला गाठलाय. त्यात विकेंडला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहता, फिल्मच्या शोमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातभरात मिळालेल्या प्रेक्षकांच्या तूफान प्रतिसादामूळे, सिनेमाच्या शोमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सिनेमाला मिळत असलेल्या उदंड प्रदिसादामुळे शोच्या वाढत्या संख्येसोबतच राज्यभरातल्या सिनेमागृहांच्या संख्येतही वाढ होतालो दिसतेय. त्यामुळे मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही हा समजही टाइमपासमनं चुकीचा ठरतोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 11, 2014, 20:14