`2 स्टेटस्`ची 100 करोड क्लबकडे वाटचाल, 2 states inching close to rs 100 crore

`2 स्टेटस्`ची 100 करोड क्लबकडे वाटचाल

`2 स्टेटस्`ची 100 करोड क्लबकडे वाटचाल

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘2 स्टेटस्’ या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगलाच दम धरलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यानंतरही या सिनेमाची प्रेक्षकांवर जादू कायम आहे.

आत्तापर्यंक या सिनेमानं भारतात 90 करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. सिनेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा सिनेमा 100 करोडच्या क्लबमध्ये लवकरच पोहचण्याची शक्यता आहे.

‘2 स्टेटस्’चा निर्माता करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला आहेत. हा सिनेमा 19 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाला होता.

तरण आदर्श ट्विटरवर या सिनेमाच्या यशाबद्दल माहिती दिलीय. ‘‘2 स्टेटस्’नं तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 1.67 करोड रुपये, शनिवारी 2.70 करोड रुपयांची कमाई केलीय. या सिनेमानं देशात एकूण 91.68 करोड रुपयांची कमाई केलीय... आणि आता हा सिनेमा 100 करोडोच्या क्लबकडे वाटचाल करतोय... सुपरहिट फिल्म’

अर्जुन आणि आलियासोबतच ‘2 स्टेटस्’ या सिनेमात रोनित रॉय, अमृता सिंग आणि रेवती यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्यात. चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन नवख्या अभिषेक वर्मन यानं केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 15:53


comments powered by Disqus