Last Updated: Wednesday, August 15, 2012, 11:33
www.24taas.com, मुंबईआपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला एकदा भेटलो असल्याची कबुली अभिनेता संजय दत्त याने सुप्रीम कोर्टाला दिली. दाऊद इब्राहिम याच्याबरोबर दुबई येथे डिनर केल्याचं संजय दत्त याने मान्य केलंय. घरात आढळलेल्या बेकायदेशीर रायफलच्या केसबद्दल बोलताना ही गोष्ट संजय दत्तने सांगितली.
अभिनेता संजय दत्तने आपली ही डिनरसाठी झालेली भेट १९९३ च्या दंगलीपूर्वी झाली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मी डिनरला गेलो असलो, तरी माझा दाऊदशी काही संबंध आहे. संजय दत्त यांच्यातर्फे वकील हरीश साळवे यांनी न्यायमूर्ती पी. सतशिवम आणि बीएस चौहान यांच्या पीठाला सांगितलं की दाऊदबरोबर एकदा डिनर जरी केलं असलं तरी संजय दत्तची दाऊदशी मैत्री नव्हती.
खंडपीठाने विचारलं, की संजय दत्त दाऊद इब्राहिमला भेटले होते का? यावर उत्तर देताना साळवे यांनी सर्वांसमक्ष संजय दत्त आणि दाऊद यांची भेट झाल्याचं सांगितलं. साळवे असंही म्हणाले की संजय दत्त आणि दाऊद आणि टायगर मेमन यांच्याशी काही संबंध नाही. मेमन हादेखईल १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील महत्वाचा आरोपी आहे.
First Published: Wednesday, August 15, 2012, 11:33