Last Updated: Tuesday, August 14, 2012, 15:52
www.24taas.com, मुंबईप्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. पण हा वाद तिने तिच्यापुरता न ठेवता विद्या बालनलाही यात ओढलं आहे.
शर्लिन म्हणाली की ती विद्या बालनसाठी वेडी आहे आणि तिच्याबरोबर इंटिमेट सीन देण्याची आपली इच्छा आहे. शर्लिनला विद्या बालनबरोबर लेस्बियन रिलेशनशिप ठेवायची आहे. शर्लिनने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, की विद्याबरोबर पॅशनेट सीन करण्याची माझी इच्छा आहे. मी तिला एवढंच सांगेन की तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ रॉय कपूर याच्यापेक्षा मी तिची चांगली काळजी घेईन. या वक्तव्यावर विद्या बालनने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर नग्न रुपात आपले फोटो काढल्याबद्दल शर्लिन चोप्रा चर्चेत आली होती. या गोष्टीचा शर्लिनला अभिमान आहे. चर्चेत राहाण्यासाठी तिने बऱ्याचवेळा अशी बेधडक विधानं तिने केली होती. हेदेखील त्यातलंच एक असावं...
First Published: Tuesday, August 14, 2012, 15:52