आमिरची धूम जोऱ्यात ३०० कोटी पार, ४००च्या जवळ, Aamir across the mist joryata 300 million, 400 on

आमीरची धूम जोरात ३०० कोटी पार, ४००च्या जवळ

आमीरची धूम जोरात ३०० कोटी पार, ४००च्या जवळ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमधील आजपर्यंत सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून चर्चेत असलेला धूम-३ने बॉक्स ऑफिसवरील कमाईमध्ये आतापर्यंत सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. धूम-३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ४०० कोटीच्या कमाईसाठी झपाट्याने पुढे पाऊल टाकतो आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट ४०० कोटी पेक्षा जास्तीची कमाई करण्याची शक्यता आहे.

धूम-३ या चित्रपटाने आतापर्यंत रेकॉर्ड तोड कमाई करत ३७० कोटी रुपयाचा व्यवसाय केला आहे. आता या चित्रपटाच्या कोट्यावधी कमाई विषयी चर्चा रंगते की, धूम ३ हा चित्रपट लवकरच ४०० कोटीचा आकडा आरामात पार करेल. मात्र असे झाल्यास भारतीय चित्रपट सृष्टीतच्या इतिहासातील ४०० कोटी पार करणारा हा एकमेव चित्रपट ठरेल. आतापर्यंत बॉलिवूडमधील कोणत्याही चित्रपटाला ३०० कोटी रुपयाचा आकडाही पार करता आलेला नाही आणि त्यामध्येच धूम-३ हा चित्रपट ४०० कोटीचा आकडा पार करण्याच्या तयारीत आहे.

धूम ३ या चित्रपटाने ‘चेन्नई एक्सप्रेस’ला मागे टाकत घरातल्या बॉक्स ऑफिसवर २४१ कोटी रुपयाची कमाई केली आहे. विश्लेषकांच्या माहितीनुसार या चित्रपटाने वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ७.०९ कोटी रुपयाची कमाई करत सर्व भाषेमध्ये २४१ कोटीचा व्यवसाय केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 16:42


comments powered by Disqus