आमिरची ‘पंचविशी’, Aamir khan completed 25 years in flim industry

आमिरची ‘पंचविशी’

आमिरची ‘पंचविशी’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऐकून हैराण झालात ना?...अहो आमिरला पंचवीसावं वय लागलयं असं आम्ही म्हणतं नाही. पण मिस्टर परफेक्टला या इंडस्ट्रीत पदार्पण करून तब्बल २५ वर्ष पूर्ण झालीत. आज २५ एप्रिलला आमिर आपल्या कामाची २५ वर्षे साजरा करतोयं.

आमिर खान `कयामत से कयामत तक`मधून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला. त्या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज तब्बल २५ वर्षे पूर्ण झालीत. या सिनेमाची संपूर्ण टीम आज हा सिनेमा परत एकत्र बघणार आहेत. त्यानंतर आमिरने एका खास पार्टीचं आयोजन केलं आहे.
२०० कोटींच्या कलेक्शनच्या आकड्यांपर्यंत पोहोचलेला तो एकमेव अभिनेता आहे. आजपर्यंत आमिरने अनेक हीट सिनेमे दिले. त्यातील कयामत से कयामत तक, दिल,रंगीला, फना जो जिता वही सिंकदर, अंदाज अपना अपना, सरफोश, लगान, दिल चाहता है, तारे जमीन पर, ३ इडियट्स हे त्याचे जबरदस्त हिट सिनेमे. यामुळेच टाईम मासिकानेही त्याचा फोटो त्यांच्या कव्हर पेजवर छापला होता. केवळ सिनेमा नव्हेच तर त्याने बनवलेल्या सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

First Published: Monday, April 29, 2013, 11:01


comments powered by Disqus