Last Updated: Saturday, August 11, 2012, 15:39
www.24taas.com, नवी दिल्लीआता सलमान खानच्या चाहत्यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. तो सुध्दा खानच आहे. बॉलिवूडमधील खान मंडळींमध्ये कायमच लोकप्रियतेच्या बाबतीत स्पर्धा दिसून येत आहे. मात्र, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान माझ्यापेक्षा सलमान खान जास्त लोकप्रिय असल्याचे वक्तव्य केले आहे.
सध्या सलमानची लोकप्रियता शिखरावर आहे. मी स्वतःही सलामानचा फॅन आहे. सलमानचे चित्रपट पाहायला मला आवडते. मला शिट्टी वाजवायला येत नाही. पण, जेव्हा सलमान आपल्या चित्रपटाच्या प्रिमिअरला मला बोलवतो, तेव्हा मी प्लास्टिकची शिट्टी घेऊन जातो आणि शिट्टी वाजवून पूर्ण हॉलमध्ये गोंधळ घालतो, असे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमिरने म्हटले आहे.
मी आमच्या २२ नातेवाईकांकडून हरदोई येथील शाहबाद येथे जमीन खरेदी केली आहे. ही एकूण ३२ एकर जमीन असून, त्यामध्ये फक्त एक घर आहे. त्या जमिनीवर आंब्याची झाडे असून, त्याठिकाणी दुसरी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही, यावेळी आमिरने सांगितले.
First Published: Saturday, August 11, 2012, 15:39