मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘पीके’साठी उतरवले कपडे!Aamir Khan goes full monty for ‘Peekay’!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘पीके’साठी उतरवले कपडे!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘पीके’साठी उतरवले कपडे!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉक्स ऑफिसवर धूम केल्यानंतर आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चाहत्यांना आणखी धक्का देण्यासाठी सज्ज झालाय. आमिर आता बाईकवर स्टंट करतांना नाही तर त्याच्या आगामी फिल्ममध्ये असं काही करणार आहे की, ज्यामुळं तुम्ही अवाक व्हाल.

राजकुमार हिराणी यांच्या आगामी ‘पीके’ या चित्रपटात आमिरनं सर्वच सिन्स स्वत: केले आहेत. डीएनए वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार आमिर खान पीकेमध्ये एका एलियनची भूमिका करतोय. त्यातल्या एका दृश्यामध्ये त्यानं आपले संपूर्ण कपडे उतरवले आहेत.

सुपरस्टार हिरो त्यांच्या लिपलॉक सिन्ससाठी प्रसिद्ध असतात मात्र चित्रपटासाठी विवस्त्र होणं हे कोणीही विचार करु शकत नाही... पण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं ते केलंय.

याबाबत राजकुमार हिराणी म्हणाले, “हे दृश्य मूळ कथानकातच होतं. मात्र मी आमिरच्या उत्तराची वाट पाहत होतो. आमिर म्हणाला मी या दृश्यासाठी कोणत्याही डमीचा वापर करणार नाही, हे स्वत: करील, मग काय त्यानं हे दृश्य चित्रित केलं.”


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 18:13


comments powered by Disqus