Last Updated: Monday, June 23, 2014, 17:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनेहमी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात जाणं टाळणारा अभिनेता म्हणजे आमीर खान. मुंबईत नुकत्याच झालेल्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला त्याची मालिका ‘सत्यमेव जयते’साठी ट्रॉफीच्या ऐवजी मिठाईचा डबा मिळालाय.
49 वर्षीय अभिनेता आमीरनं त्याच्या मालिकेतून समाजाबद्दल मोठं योगदान केलंय. त्यासाठीच त्याचा हा सन्मान केला गेला. या कार्यक्रमात सामाजिक समस्या जशा बलात्कार, महिलांसोबतचा भेदभाव, भ्रष्टाचार, शिक्षाशी निगडीत मुद्दे दाखवले गेले आहेत.
या पुरस्कार सोहळ्यासाठी आमीर खान पत्नी किरण राव सोबत पोहोचला. “मी इथं पुरस्कार स्वीकारून खूश आहे. मात्र मला नाही वाटत आपण मला मिठाई द्यावी, कारण ‘धूम -3’ नंतर माझं वजन खूप वाढलंय. मला वाटतं चित्रपटाचं यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये मी खूप महान दिग्दर्शकांसोबत काम केलं”, असं आमीर खान म्हणाला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 23, 2014, 17:22