Last Updated: Wednesday, October 24, 2012, 12:45
www.24taas.com, बगदादबॉलिवूडचा `एस खान` आमिर सध्या आपल्या आईला घेऊन हज यात्रेला गेला आहे. यादरम्यान एक अनोखी गोष्ट घडली. आमिर खानची या प्रवासादरम्यान पाकिस्तानच्या बॅट्समन, ऑल राऊंडर `बूम बूम` शाहिद आफ्रिदीशी अचानक भेट घडली. ही भेट आधी ठरलेली नव्हती.
आमिर खान आणि शाहिद आफ्रिदी यांची भेट एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान गर्दीमध्ये झाली. या दोघांनी मुस्लिम विद्वान मौलाना तारिक जमिल यांचीही भेट घेतली. यावेळी मौलाना मक्केचं महत्व समजावून सांगत होते.
या भेटीनंतर आमिर खान हजसाठी रवाना जाला, तर शाहिद आफ्रिदी सौदी अरेबियाला निघून गेला.
First Published: Wednesday, October 24, 2012, 12:45