Last Updated: Monday, March 3, 2014, 18:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानेन १० कोटी रूपयांची कार विकत घेतली आहे, ही कार बॉम्बप्रुफ आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार आमीर खानला मिळालेल्या धमकीनंतर आमीरने ही कार खरेदी केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
देशातील काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे ही कार आहे. यात पंतप्रधान आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचा समावेश आहे.
स्टार प्लसवर सुरू असलेल्या सत्यमेव जयते नावाच्या शोमुळे आमीर खानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आमीर खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सत्यमेव जयते या शोमध्ये बेधडकपणे सामाजिक मुद्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. आमीर खानचा हा शो लोकांमध्ये लोकप्रिय होतोय.
मात्र आपल्या जीवाला काहीही धोका नसल्याचं आमीर खानने म्हटलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आमीर खानच्या निकटवर्तीयांनी ही गाडी घेण्यास आमीरला आग्रह केला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 3, 2014, 18:42