धूम-३ने कमाविले ३०० कोटी, Aamir Khan`s `Dhoom: 3` collects Rs 227 cr in 10 days

धूम-३ने कमाविले ३०० कोटी

धूम-३ने कमाविले ३०० कोटी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमीर खानच्या धूम 3 ने नऊ दिवसातच 300 कोटींचा टप्पा गाठलाय... भारतात या सिनेमाने जवळपास 211 कोटींचा बिझनेस केलाय.. तर भारताबाहेर सुमारे 100 कोटींचा टप्पा गाठलाय...

याआधाही शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेसने 216 कोटींचा बिझनेस करुन एका नवा रेकॉर्ड केलाय.. मात्र, चेन्नई एक्सप्रेसचा हा रेकॉर्ड धूम 3 लवकरच मोडेल असंही म्हटलं जातंय..

आमीर खानसह या चित्रपटात अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, कतरिना कैफ आहेत. २० डिसेंबरला देशातील ४०० सिनेमाघऱात हा चित्रपट रिलिज करण्यात आला. १०० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट यशराज बॅनरखाली तयार करण्यात आला. या चित्रपटाने हिंदी भाषेत २११ कोटींची कमाई केली आहे तर इतर भाषेत १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. परदेशातही या चित्रपटाने धमाल केली असून १०० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे एकूण ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई धूम-३ ने केली आहे.
मुक्ता आर्ट्सच्या संजय घई यांच्यानुसार हा चित्रपट एकट्या भारतात ३०० कोटी रूपये कमविणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013, 16:46


comments powered by Disqus