Last Updated: Saturday, October 27, 2012, 14:45
www.24taas.com, मुंबईमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘तलाश’ हा आगामी चित्रपट अखेरीस नोव्हेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर रिलिज होणारय हे स्पष्ट झालयं. आमिर खानचे फॅन्स त्याच्या आगामी तलाश चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. तलाश सिनेमाचे प्रोमोज एवढे रहस्यमय आहेत की प्रेक्षक स्वतःला हा चित्रपट पाहण्यासाठी थांबवू शकणार नाहीत. `सरफरोश` चित्रपटानंतर आमिर पहिल्यांदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाचा विषय एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. आमिरसोबत अभिनेत्री राणी मुखर्जी आणि करीना कपूर दिसणार आहेत. चित्रपटात राणी मुखर्जी आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे तर करीना सेक्स वर्करच्या भूमिकेत आहे, पण प्रोमो पाहताना नक्की ती सेक्स वर्कर आहे की नाही? किंवा आमिर खानला चकवण्यासाठी करीनाने तसा मुखवटा चढवला आहे? या सर्वांची रहस्यमय कहाणी चित्रपट सिनेमागृहात आल्यानंतरच उघड होईल. करीनाच्या लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
चित्रपटाचं दिग्ददर्शन रीमा कागती यांनी केलयं. चित्रपटात रानी आणि आमिरचे बरेच बोल्ड सिन्स पाहायला मिळतील. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी आमिर आधी शाहरूखला विचारण्यात आले होते. चित्रपटाची बरीचशी शूटींग ग्रॅन्टरोडच्या कामाठीपूरामध्ये करण्यात आलीय. कामाठीपूरा मुंबईतील सर्वात जुना आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा रेडलाईट एरिया आहे.
शाहरूखचा ‘जब तक है जान’ चित्रपटसुध्दा नोव्हेंबरमध्येच रिलिज होणार आहे, आमिर आणि शाहरूख या दोघांच्या चित्रपटांवर याचा काही परिणाम होईल का? पण तसं पाहता बरेच दिवस सिनेचाहत्यांसाठीही गेले काही महिने चांगले चित्रपट पाहण्यास मिळालेले नाहीत तर कदाचित येत्या दिवाळीत प्रेक्षकांना उडवलेल्या चांगल्या चित्रपटांचा मोठा बार पाहायलाही मिळेल.
First Published: Saturday, October 27, 2012, 14:36