Last Updated: Tuesday, February 19, 2013, 13:21
www.24taas.com, राजस्थान मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नेहमीच प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात त्याला नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा छंदच आहे. सध्या, तो बिझी आहे त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये... राजस्थानात.
नुकताच, आमिर आपल्या आगामी चित्रपटासाठी राजस्थानमध्ये एका फोटोशुट दरम्यान दिसला. यावेळी आमिरने आपल्या अंगावर चढवला होता ब्लेझर आणि पिवळ्या रंगाचा घागरा... सूत्रांच्या माहितीनुसार, गळ्यात रेडिओ अडकवलेला आमिर शूट करत होता राजकुमार हिराणींच्या ‘पीके’साठी… या सिनेमात आमिर खानसोबत अभिनेता संजय दत्तही दिसणार आहे.
राजकुलमार हिराणी यांच्या ‘पीके’ या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळली जातेय. आमिर खानची या सिनेमातली नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल तो चुकूनही बोलताना दिसत नाही. आमिरचा हा नविन लूक पाहता त्याच्या या सिनेमाबद्दल प्रक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
First Published: Tuesday, February 19, 2013, 13:16