Last Updated: Saturday, January 11, 2014, 14:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमिस्टर परफेक्ट आमीर खानचं आणखी एक स्वप्न आहे. स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यावर चित्रपट बनवण्याचं आमीरचं स्वप्न आहे. आमीर स्वत: मौलाना अब्दुल कलाम यांच्या परिवारातून आहे.
आमीर खान म्हणतो, मी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचं काम मोठ्या पडद्यावर आणू इच्छीतो, कारण त्यामुळे त्यांचं काम सर्वांपर्यंत पोहोचेल, मी त्यांच्याबद्दल वाचलं आहे.
आमीर सध्या राजकुमार हिरानी यांनी निर्देशित केलेला चित्रपट पीकेमध्ये व्यस्त आहे, पीके हा सिनेमा या वर्षी रिलीज होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 11, 2014, 14:11