Last Updated: Saturday, August 11, 2012, 14:49

www.24taas.com, मुंबई
आपण म्हणाल, पॉर्नस्टार सनी लिऑन हिचे बॉलिवूड स्टार आमिर खान याच्याशी काय देणेघेणे? मात्र, खरी गोष्ट आहे की, आमिर खानने आपल्या हळूवार भावनांनी घायाळ केले. त्यानंतर सनी लिऑनला रडली.
आपल्याला आमिर खानचा शो ‘सत्यआमेव जयते` आठवत असेल. सातत्याने नविन प्रश्न हाती घेवून त्यावर चर्चा घडवून आणली. मात्र, असे करताना त्यांने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. अनेकांची दु:खे हलकी केली मात्र, या दु:खांना वाचा फोडण्याचे काम आमिरने केले. लोकांचे प्रश्न आणि त्यांना झालेले कष्ट, त्यांच्या हालअपेष्टा यामुळे पिचलेले लोक, यांचे प्रश्न मांडताना मिस्टेर परफेक्ट आमिर खानच्या डोळ्यात पाणी आले. टीव्ही प्रेक्षकांमध्ये सनी लिऑनचाही समावेश होता. त्यावेळी आमिर रडतानाचे दृश्य सनीने पाहिले आणि तिच्याही डोळ्यात अश्रू आलेत.
सनी लिऑन जिस्म-२ची केवळ हिरोईन नाही. तर ती विचार करणारी आहे. तिच्यामते आमिर खान असला हिरो आहे आणि तो एक खास आहे. तो सर्वांपेक्षा वेगळा आहे आणि तो उत्तम आहे. आमिर खान टीव्हिवर अश्रू ढाळायचा त्यावेळी मलाही रडू यायचे. मी त्याला अश्रू आवरण्यासाठी सांगणार होते. मात्र, तो मोठा हिम्मतवाला आणि शक्तीशाली आहे. आमिर माझ्या सर्वात आवडता अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला मला अधिक आवडेल, असे सनी सांगायला विसरत नाही.
First Published: Saturday, August 11, 2012, 14:49