आमिर खान विरुद्ध उभा ठाकणार रजनीकांत,Aamir vs Rajanikant On Box office

आमिर खान विरुद्ध उभा ठाकणार रजनीकांत

आमिर खान विरुद्ध उभा ठाकणार रजनीकांत
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

या वर्षी डिसेंबरमध्ये मिस्टर परफेक्शंनिस्ट आमिर खान आणि सुपरस्टार रजनीकांत बॉक्सष ऑफिसवर समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
२० डिसेंबरला आमिरचा ‘धूम-३` तर रजनीकांतचा ‘कोचेदियान` १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत.

दोन्ही चित्रपट बिग बजेट आहेत. रजनीकांतची मुलगी सौंदर्या हिने ‘कोचेदियान`चे दिग्दर्शन केले आहे. आधी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो १२ डिसेंबरला रजनीकांत यांच्या वाढदिवशी तमीळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी आणि जपानी या भाषांमधून एकाच वेळी प्रदर्शित होईल.

विजय कृष्ण आचार्य यांनी "धूम-३` दिग्दर्शित केला आहे. ‘धूम-३`मध्ये आमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ आणि उदय चोप्रा यांच्या हे प्रमुख भूमिका निभावत आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 13:40


comments powered by Disqus