आराध्यानं ऐश्वर्यासाठी म्हटलं ‘हॅपी बAaradhya wishes Happy Birthday to mother Aishwarya Rai Bachchan

आराध्यानं ऐश्वर्यासाठी म्हटलं ‘हॅपी बर्थडे’!

आराध्यानं ऐश्वर्यासाठी म्हटलं ‘हॅपी बर्थडे’!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज वाढदिवस... ही माजी विश्व सुंदरी आज ४० वर्षांची झालीय. सामाजिक कार्यात सहभाग घेऊन ऐश्वर्यानं आपला वाढदिवस साजरा केलाय. हा दिवस ऐश्वर्यासाठी खास ठरला कारण छोट्या आराध्यानं ‘हॅपी बर्थडे’ गाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

‘आपला वाढदिवस अर्थपूर्ण बनविण्यासाठी सामाजिक कार्यात सहभाग घेणं मी माझ्या आई-वडिलांकडून शिकलेय. वाढदिवस मी मुलांसोबत साजरा केला’ असं ऐश्वर्यानं म्हटलंय. यावेळी आराध्या हे आजवर मिळालेलं सगळ्यात मोठं गिफ्ट असल्याचं ऐश्वर्यानं आवर्जून सांगितलंय तसंच कुटुंबियांसोबत आणि मोजक्याच मित्रमंडळींसोबत ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन केलं. नेहमीच उशीरा झोपणाऱ्या छोट्या आराध्यानं रात्रीच आपल्या आईच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे गाऊन हा दिवस तिच्यासाठी खास बनविला.

आपल्या घरी जन्मदिन साजरा करताना ऐश्वर्याला पत्रकारांनी अभिषेकनं काय गिफ्ट दिलं असा सवाल केला असता, ‘ते तर अभिषेकच सांगू शकेल... तसं तर त्यांनी मला अगोदरच छानसं गिफ्ट दिलंय ते म्हणजे आराध्या’ असं ऐश्वर्यानं म्हटलंय.

हम दिल दे चुके सनम, देवदास, धूम टू, जोधा अकबर अशा अनेक हीट फिल्म्स ऐश्वर्याने बॉलिवूडला दिल्यात आणि आता पुन्हा एकदा ही सौंदर्यवती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करायला सज्ज झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 1, 2013, 17:48


comments powered by Disqus