Last Updated: Wednesday, May 14, 2014, 20:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकतरीना कैफचे फॅन्स आपलं प्रेम तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकतात यावर चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. नुकतंच एका भक्तानं कतरीनासाठी आरती लिहून याचाच एक नमूना सादर केलाय.
आगामी ‘फिल्मीस्तान’ या हिंदी सिनेमाचा अभिनेता शारिब हाशमी यानं आपल्या सिनेमात कतरीना कैफवर एक आरतीच लिहून टाकलीय.
इतकंच नाही तर ही आरती इंटरनेटवरही टाकण्यात आलीय. कतरिनाला मात्र या आरतीबद्दल माहीत पडलं तेव्हा मात्र तिनं ही आरती ऐकण्यासाठी नकार दिला. खरं म्हणजे कतरिनाला ही आरती ऐकण्यासाठी थोडं असहज वाटत होतं. या सिनेमात शारिब कतरिनाचा भक्त बनलाय.
फिल्मिस्तान ही एका अशा माणसाची कथा आहे ज्याला बॉलिवूडची धुंदी चढलीय आणि त्यामुळेच या सिनेमात केवळ कतरिनाच नाही तर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यावरदेखील आरत्या बनवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
व्हिडिओ पाहा - *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 20:48