Last Updated: Tuesday, October 30, 2012, 18:02
www.24taas.com, नवी दिल्लीपॉर्न स्टार सनी लियॉनने जेव्हा जिस्म-२ या सिनेमातून पदार्पण केलं तेव्हा काहीजणांनी त्याला विरोध केला. पॉर्न स्टारला बॉलिवूडपासून दूर ठेवले गेले पाहिजे असा सूर लावण्यात आला होता. मात्र बॉलिवूडमध्ये असेही काही लोक आहे जे सनी लियॉन आणि तिच्यासारख्या अनेक पॉर्नस्टारची वकिली करताना दिसून येतात.
बॉलीवूडचा अभिनेता अभय देओल बॉलिवूडमध्ये वाढणाऱ्या अश्लीलतेमुळे खूपच नाराज आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की, सध्या सनी लियॉन सारख्या अनेक पॉर्न स्टारची गरज आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभय देओल म्हणतो की, मला या गोष्टीची खुशी की, सनी लियॉनने जिस्म -२ सारखा एक चांगला सिनेमा केला. मला असं वाटतं की, आणखी पॉर्न स्टारने बॉलिवूडमध्ये यावं. त्याच्या मते पॉर्न स्टार व्यवस्थितपणे आपल्या अभिनय करू शकतात.
अभयने सांगितले की, पॉर्न इंडस्ट्रीमधून समोर आणणं जास्त महत्त्वाचं आहे. बॉलिवूडच्या अतिखुलेपणावर अभय नाराज आहे. हॉलिवूडमधील सिनेमातील न्यूड दृश्यांपेक्षाही जास्त अश्लील असे दृश्य आपल्याकडे असतात.
First Published: Tuesday, October 30, 2012, 17:50