घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चनने ट्विटabhishek aishwarya rai split jr. bachchan refutes divorce rumours

घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चनने ट्विटरवरून दिले उत्तर

घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चनने ट्विटरवरून दिले उत्तर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा घटस्फोट होणार या बातम्यांना जुनिअर बच्चन अभिषेकने ट्विटरवरून स्पष्ट शब्दात फेटाळले आहे. पण अभिषेकने ज्या प्रकारे ट्विट केला आहे, तो खूपच मजेदार आहे.

अभिषेकने ट्विट केले, ओके.... ठिक आहे मी मानतो मी घटस्फोट घेणार आहे. धन्यवाद मला याबाबत सांगितल्याबद्दल... आता मला तुम्ही हे ही सांगा का की मी दुसरं लग्न कधी करणार आहे? धन्यवाद....




विशेषतः अशा बातम्या समोर आल्या की अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात दुरावा वाढत आहे. लवकरच त्यांच्या घटस्फोट होणार आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याचे २००७ मध्ये लग्न झाले होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 18:02


comments powered by Disqus