शाहरूखचा अबराम पहिल्यांदा झाला कॅमेरात कैद!,Abraham`s First Public Appearance

शाहरूखचा अबराम पहिल्यांदा झाला कॅमेरात कैद!

शाहरूखचा अबराम पहिल्यांदा झाला कॅमेरात कैद!
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई

शाहरुखच्या अबराम या मुलाची एक झलक बघण्यासाठी आसुसलेल्या तमाम शाहरूक फॅन्सला खूशखबर! या छायाचित्रात दिसतोय तो आहे किंग खानचा अबराम. शाहरूखच्या आर्यन आणि सुहाना या मुलांना माध्यमांमधून अनेकवेळा आपण बघितले असेल. मात्र मे महिन्यात जन्मलेल्या शाहरूकच्या या मुलाला अजून सर्वांसमोर आणण्यात आलेले नव्हते.

१६ ऑक्टोबरला म्हणजेच ईदच्या दिवशी शाहरुखच्या `मन्नत` बंगल्याच्या एका बाल्कनीत देखभाल करणाऱ्या दायीच्या कुशीमध्ये अब्रामची झलक पाहायला मिळाली. या दाई अब्रामला खाऊ घालताना आणि अन्य दोन महिला दुसऱ्या बाल्कनीत उभ्या असलेल्या दिसल्या.

ईदचा दिवस असल्याने आपली एक झलक पाहण्यासाठी उभ्या असलेल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी शाहरुखदेखील बंगल्याच्या बाहेर आला होता. आपल्या चाहत्यांना अभिवादन करून जेव्हा शाहरूख बंगल्यात परतला आणि चाहते देखील निघून जायला लागले. त्याचवेळेस अबराम आणि या त्याच्या दाया बाल्कनीमध्ये उभ्या दिसल्या.

शाहरूख आणि गौरी खानच्या या अपत्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. या मुलाच्या गर्भलिंग चाचणीवरून बरेच वादंग झाले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 19, 2013, 21:07


comments powered by Disqus