‘अभिनय तर माझ्या रक्तातच...’, acting is in my blood says kareena kapoor

‘अभिनय तर माझ्या रक्तातच...’

‘अभिनय तर माझ्या रक्तातच...’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कपूर ‘खानदाना’तून आल्यानं अभिनय तर माझ्या रक्तातच आहे, असं म्हणतेय करीना कपूर... कपूर कुटुंबीयांचं आणि बॉलिवूडचं नातं गेल्या ८५ वर्षांपासून घट्ट जोडलं गेलंय.

करीना कपूरचे पंजोबा म्हणजेच पृथ्वीराज कपूर यांनी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं १९२८ साली... याच परंपरेला त्यांच्या तीनही मुलांनी म्हणजेच राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी पुढे अबाधित ठेवलं. त्यानंतर राज कपूरच्या तीनही मुलांनी म्हणजेच रणधीर, ऋषि आणि राजीव कपूर यांनीही हीच परंपरा पुढे कायम राखली.

या पिढीपर्यंत ही परंपरा फक्त कपूर खानदानातले मुलंच चालवत होते पण, रणधीर कपूर यांची मुलगी करिश्मा कपूर हीनं अभिनयाच्या जगात पाऊल टाकलं आणि त्याच पावलांवर पाऊल टाकत करीनाही चित्रपटसृष्टीत दाखल झाली.

करीना म्हणते की, माझ्या मोठ्या बहिणीनं करिश्मानं बॉलिवूडमध्ये मला रस्ता दाखवला कारण, कपूर खानदानातली ती पहिली महिला होती जिनं अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. करीनानं बॉलिवूडमध्ये गेल्या १३ वर्षांच्या काळात ४५ सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावल्यात. ज्यामध्ये अजनबी, ऐतराज, जब वी मेट आणि ३ इडियटस् सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 10, 2013, 15:33


comments powered by Disqus