Last Updated: Sunday, April 13, 2014, 18:20
www.24taas.com, झी मीडिया, पुणेमहानायक अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण प्रत्यक्षात अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिनयाचे धडे घेण्याची संधी पुण्यातील रमणबाग प्रशालेतील पार्थ भालेराव या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाली आहे.
महानायक अमिताभ यांना एकदा तरी पाहावे, असे अनेकांचे स्वप्न असते. हेच स्वप्न पार्थनेही पाहिले होते आणि ते पूर्णही आज पूर्णही झाले.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात पार्थने त्यांच्यासोबत प्रमुख बालकलाकाराची भूमिका साकारली आहे; पण ती साकारताना अभिनय नेमका कसा करावा, चित्रपटातील संवाद म्हणताना आवाजातील चढ-उताराकडे नकळतपणे कसे लक्ष द्यावे, चेहऱ्यावरील हावभाव कसे असावेत, अशा अनेक बारीकसारीक गोष्टी अमिताभ बच्चन यांनी गप्पा मारत शिकविल्या. या महानायकाने आपल्याला स्वतः मूल होऊन त्या मला सांगितल्या, असे पार्थ अमिताभ यांच्याविषयी बोलतांना सांगितले.
याआधीही काही मराठी चित्रपटांत पार्थने भूमिका साकारल्या आहेत. त्या पाहून अमिताभ यांच्या चित्रपटासाठी पार्थचे नाव सुचविण्यात आले. याविषयी तो म्हणाला, ""या चित्रपटात अमित अंकल आहेत, इतकंच माहिती होतं; पण त्यांच्यासोबत सलग इतका वेळ काम करायचं आहे, हे माहिती नव्हतं. त्यांच्याबरोबरच शाहरुख खान, बोमन इराणी यांच्याबरोबरही काम करण्याची संधी मिळाली. हे क्षण आणि अमित अंकल यांनी दिलेले धडे मी कधीच विसरू शकत नाही.`` असंही पार्थने म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 13, 2014, 18:20