अभिनेत्री सना खान फरार, मुलीचे केलं अपहरण, Actor Sana Khan abscond for Girl kidnapping

अभिनेत्री सना खान फरार, मुलीचे केलं अपहरण

अभिनेत्री सना खान फरार, मुलीचे केलं अपहरण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री सना खान हिच्याविरोधात एका १५ वर्षाच्या मुलीचं अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा चुलत भाऊ नावेद आणि त्याचे दोन मित्र क्षितीज दुबे आणि विस्मित अंब्रे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला, त्यावेळी या चौघांसोबत असलेल्या एका १७ वर्षाच्या नावेदनं या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर नावेद, सनानं तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुलीच्या आईनं केली आहे.

मुलालाही बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या चौघांनाही जामीन मिळाला असून सनाला फरार घोषित करण्यात आलं आहे. सलमान खानसोबत सनाचा मेंटल हा सिनेमा सुरू आहे. ३० एप्रिलपासून ती सिनेमाच्या सेटवर आलेली नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013, 12:07


comments powered by Disqus