ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचं निधन , actor suhas bhalekar is no more

ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचं निधन
www.24taas.com, मुंबई

ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचं निधन झालंय. गेली साठ वर्ष त्यांनी रंगभूमीची सेवा केली.

१९६० ते १९७६ अशी सोळा वर्ष त्यांनी शाहीर साबळेंबरोबर काम केलं. पंतांची सून, युद्धांच्या सावल्या, एकच प्याला, तुझे आहे तुजपाशी, अंमलदार, मी मंत्री झालो, बेबंदशाही, , सासरे बुवा जरा जपून, राजकारण गेलं चुलीत, अशा अनेक नाटकातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.

तर झुंज, चानी, लक्ष्मी, शापित, भुजंग, गंमत-जंमत, बाळाचे बाप ब्रह्म्चारी, बोडक्याचा बाजीराव, झंजावात, येड्यांची जत्रा या मराठी सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

`गोट्या भाकरी आणि फूल`, `कशाला उद्याची बात`, `वहिनी साहेब` यांबरोबरच `असंभव` मालिकेतली त्यांची सोपानकाकाची भूमिका गाजली.

First Published: Saturday, March 2, 2013, 13:09


comments powered by Disqus