चॉकलेट हिरो शशी कपूर यांचा ७५ वाढदिवस, Actors Shashi Kapoor`s birthday

चॉकलेट हिरो शशी कपूर यांचा ७५ वाढदिवस

चॉकलेट हिरो शशी कपूर यांचा ७५ वाढदिवस
www.24taas.com, मुंबई

अभिनेते शशी कपूर यांचा आज ७५ वा वाढदिवस. चॉकलेट हिरो म्हणून ख्याती असलेले सर्वांचे लाडके शशी कपूर .. आज वाढदिवसाच्या निमित्ताने शशी कपूर यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टिक्षेप.

व्हीओ : शशी कपूर अर्थातच बलवीरराज. १८ मार्च १९३८ साली कोलकतामध्ये शशी कपूर यांचा जन्म झाला.. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला.. आवारा सिनेमात राज कपूर यांच्या लहानपणाची भूमिका शशी कपूर यांनी साकारली.. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले.. त्यानंतर १९६१साली धरमपुत्र या सिनेमातून शशी कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत हिरो म्हणून एन्ट्री केली.. जब जब फूल खिले या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली.. AMBIENCE ( परदेसीयों से ना अखियाँ मिलाना)

या सिनेमानंतर मात्र, त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.. आमने सामने, वक्त, आ गले लग जा, हसिना मान जायेगी, शर्मिली, चोर मचाये शोर, अशा एकाहून एक सरस फिल्म्स त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला दिल्यात.. कपूर खानदानाकडून मिळालेलं देखणेपण आणि कॅमेरासमोरचा सहज वावर या दैवी देणगीमुळे रोमॅण्टिक हिरो म्हणून आपल्या चाहत्यांमध्ये ते फेवरेट झाले..डान्स करताना खांदे उडवायची त्यांची विशिष्ट शैला सर्वांनाच भावली.
अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.. दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं.

एक निर्माता म्हणूनही शशी कपूर यांनी वैविध्यपूर्ण सिनेमांची निर्मिती केली..वडिल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पृथ्वी थिएटरची स्थापना केली.. अनेक बड्या फिल्मस्टार्ससह वावरताना सिनिअर असल्याचा तोरा शशी कपूर यांनी कधीच मिरवला नाही. कायम माणूसकी आणि साधेपणा जपला.. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

First Published: Monday, March 18, 2013, 09:05


comments powered by Disqus