अभिनेत्री अलका पुणेवार सापडली, अपघाताचा बनाव उघड, Actress Alka punevara found, exposed fabric accide

अभिनेत्री अलका पुणेवार सापडली, अपघाताचा बनाव उघड

अभिनेत्री अलका पुणेवार सापडली, अपघाताचा बनाव उघड
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

गेले ११ दिवस बेपत्ता असलेल्या अभिनेत्री अलका पुणेवार बेपत्ता प्रकरणाचा त्यांच्या ड्रायवरला ताब्यात घेतल्यानंतर अखेर उलगडा झाला आहे. अलका पुणेवार या सुखरूप चेन्नईत सापल्या असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आल्याची माहीती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

नव-याच्या त्रासाला वैतागून अलका पुणेवार यांनीच आपल आस्तित्व मिटवून पतीपासुन कुठेतरी दूर निघून जाण्याचा कट रचल्याच समोर आलं आहे.आपल्या ड्रायव्हच्या मदतीन त्यांनी आपली दरी खोपोलीच्या घाटात फेकली आणि नवरा आपला शोध घेणार नाही, अशा ठिकाणी निघून गेल्या.

पुणेवार बेपत्ता झाल्यानंतर ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये पहिल्या दिवशी अपहरणाचा, आणि नंतर बेपत्ता झाल्याच्या गुन्हा दाखल झाला होता.या तपासासाठी ठाणे पोलिसांनी चार पथक तयार केली होती.मुंबई क्राईम ब्रँचनं अलका पुणेवार यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 19:39


comments powered by Disqus