अभिनेत्री लवलीन कौरवर प्राणघातक हल्ला!, Actress Loveleen Kaur assaulted as bystanders watch

अभिनेत्री लवलीन कौरवर प्राणघातक हल्ला!

अभिनेत्री लवलीन कौरवर प्राणघातक हल्ला!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवसेंदिवस महिलांविरोधात होणाऱ्या गुन्हांची संख्या मुंबईत वाढताना दिसत आहे. सामान्य माणसांपासून सिरिअलच्या अभिनेत्रींपर्यंत कोणालाही मुंबईत सुरक्षित वाटत नाही आहे. मुंबईला हादरून टाकणाऱ्या गँगरेपनंतर टीव्ही अभिनेत्री लवलीन कौर आणि तिच्या मैत्रिणीला काल भर वर्दळीच्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. लवलीन कौर एका पर्स चोराचा पाठलाग कर होती त्यावेळी त्यांच्या टोळीने तिला आणि तिच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. यावेळी तेथं जमलेल्या नागरिकांनी बघ्याची भूमिका घेऊन माणुसकीला काळीमा फासला.

काल लवलीन कौर ऑटो रिक्षाने जात असताना एका पर्स चोराने तिची पर्स हिसकावली आणि तो पळत सुटला. यावेळी लवलीन सोबत तिच्या मैत्रिणीने पर्स चोराचा पाठलाग केला. परंतु, पर्स चोरांच्या टोळीत असलेल्या आणखी दोघांनी अभिनेत्री लवलीन आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी उपस्थित जमावाने दोघांना मदत करण्यापेक्षा फक्त बघ्यांची भूमिका घेतली.

ही घटना सदैव वर्दळ असलेल्या ओशिवारा जंक्शन येथे घडली. अभिनेत्रीने शेवटी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. यातील दोघा संशयीतांना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. या मारहाणीत अभिनेत्री आणि तिची मैत्रीण जखमी झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 19:07


comments powered by Disqus